“कर्मवीर” या शैक्षणिक संकेतस्थळावर(ब्लॉग) आपले सहर्ष स्वागत आहे.त्याची वेब लिंक karmveeranna.blogspot.in ही असून आज दिनांक-२२ सप्टेंबर २०१५ रोजी कर्मवीर जयंतीदिनी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी - पालक – शिक्षक यांना समर्पित केलेल्या शैक्षणिक संकेतस्थळाचे अनावरण मा. श्री.औताडे साहेब शिक्षणाधिकारी (माध्य.) नाशिक तसेच मा.पाटील पी.एस.(व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी )नाशिक यांच्या शुभहस्ते ,स्कूल कमेटी चेअरमन मा.एन.जी.पाटील सर,प्रसिद्ध व्याख्याते श्री शिवाजी कांडेकर,विद्यालाचे प्राचार्य श्री चौरे पी.बी.यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.तरी याचा प्रसार अधिकाधिक विध्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे सहकार्य करावे.
“नही ज्ञानेन स:सदृशं पवित्रमं यह:विद्यते!” म्हणजेच ज्ञानासारखी पवित्र दुसरी कुठलीही
गोष्ट या सृष्टीतलावावर अस्तित्वात नाही या संस्कृत वचनाला प्रमाण मानून हा एक
छोटासा प्रयत्न केला असून त्यातील ज्ञानसाठयाचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ
व्हावा अशी रास्त अपेक्षा आहे.माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यासाठी समर्पित असलेले महाराष्ट्रातील हे पहिलेच संकेतस्थळ आहे.या संकेतस्थळामधील माहिती निश्चीती आमच्या
न्यू इंग्लिश स्कुल चांदोरी ता.निफाड जि.नाशिक या विद्यालयातील विद्यार्थ्याशी
गटचर्चा करून केली आहे.यात अजून योग्य ते अनुरूप बदल केले जाणार आहेत. हे संकेतस्थळ
अधिकाधिक व्यापक व परिपूर्ण होण्यासाठी आपल्या वाचकाच्या सुचना व मार्गदर्शनाचे
नक्कीच स्वागत केले जाईल .
आपला
स्नेहांकित,
श्री.पगार पी.बी.(उपशिक्षक)
न्यू
इंग्लिश स्कूल चांदोरी ता.निफाड जि.नाशिक
No comments:
Post a Comment